संख्या व संख्यांचे प्रकार (महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या) - (1) Numbers and types of numbers - (1) Important formulas / rules / definitions

 




मिशन स्कॉलरशिप {मिस्कॉ}

        विषय- गणित 

महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या [संख्या व संख्यांचे प्रकार-1]

खालील व्याख्या व उदाहरणे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या

{1} सम संख्या- ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्यांना सम संख्या म्हणतात.

* सर्व सम संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो.

#उदा- 14, 212, 3496, 5000 इत्यादी.

 @एकूण सम संख्या –

 1)एक अंकी- 4 

(2)दोन अंकी-45 

(3)तीन अंकी – 450 

(4)चार अंकी – 4500 

(5)पाच अंकी – 45000          

(6)सहा अंकी- 450000 

(7)सात अंकी- 4500000 

(8)आठ अंकी -45000000

 

{2}विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात.

*सर्व विषम संख्यांना 2 ने भागले असता बाकी 1 उरते.

#उदा- 17, 469, 6503, इत्यादी.

@एकूण विषम संख्या – 1)एक अंकी – 5, दोन अंकी, तीन अंकी............आठ अंकी सर्व सम संख्येप्रमाणेच.

 

{3} मूळ संख्या – ज्या संख्येला ती संख्या व 1 याव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

* फक्त 2 हि समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत.

* 1 ते 100 संख्यांच्या दरम्यान एकूण 25 मूळसंख्या आहेत.

* 1 ते 100 मधील मूळसंख्या-2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97.

 

{4} जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यात 2 चा फरक असतो, अशा 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत.

*जोडमूळ संख्या - 3 – 5, 5 – 7, 11 – 13, 17- 19, 29 – 31, 41 – 43, 59 – 61, 71-73

Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.