scholarship exam fee Increase स्कॉलरशिप परीक्षा फी मध्ये वाढ (५ वी व ८ वी )



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करणेबाबत....


                सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व शर्तीमध्ये दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु.१०/- वरुन रु.२०/- करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु.५०/- वरुन रु.६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु.१०/- वरुन रु.२०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.

                   शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.


वाचा शासन निर्णय : 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.