LATA MANGESHKAR INFO लता मंगेशकर पूर्ण माहिती

 






जन्म

[सप्टेंबर २८]इ.स. १९२९

जन्म स्थान

इंदूरमध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)

मृत्यू

६ फेब्रुवारी २०२२

मृत्यू स्थान

मुंबई, महाराष्ट्र


व्यक्तिगत माहिती

धर्म

हिंदू

नागरिकत्व

भारतीय

मूळ गाव

मंगेशीगोवा

देश

भारत

भाषा

मराठीहिंदी भाषा

पारिवारिक माहिती
आईशेवंती उपाख्य शुद्धमती मंगेशकर  माई मंगेशकर
 मूळ गाव = थाळनेर(शिरपूर-धुळे)
वडीलमास्टर दीनानाथ मंगेशकर
नातेवाईक आशा भोसले
 उषा मंगेशकर
 हृदयनाथ मंगेशकर
 मीना खडीकर

पारिवारिक माहिती

आई

शेवंती उपाख्य शुद्धमती मंगेशकर  

माई मंगेशकर

 मूळ गाव = थाळनेर

(शिरपूर-धुळे)

वडील

मास्टर दीनानाथ मंगेशकर

नातेवाईक

आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ 

 मंगेशकर
मीना खडीकर


संगीत कारकीर्द
कार्यपार्श्वगायन,
सुगम संगीत
पेशापार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ  इ.स. १९४२     पासून
गौरव
विशेष उपाधीगानकोकिळा
पुरस्कारभारतरत्न
(२००१)

साभार : WIKIPEIDIA



गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज दिनांक ०६/०२/२०२२ रोजी देहावसान.....

त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती : 



गाणकोकिळा / भारत रत्न /
 श्रीमती लता दिदी

               काही माणसं जन्मजात अश्या घरी जन्म घेतात ...ते आई वडील  पुण्यवान म्हणावी .. मला वाटतं अशी माणसं  अवतार घेतात... जसं छ.शिवाजी महाराज डाँ.बाबासाहेब आंबेडकर,  भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. भारताची गानकोकिळा आपण सगळे त्यांना लता दीदी या लाडक्या नावानं ओळखतो. आपल्या सुरेल गळ्यातून अक्षरश: हजारो हिंदी-मराठी गाणी गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. गेली सहा दशकं त्यांची हिंदी-मराठी चित्रपट गीतं ऐकत आपण मोठे झालो.

      लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. फार कमी लोकांना माहीत असेल कीत्यांचं पाळण्यातलं नाव `हृदयाहोतं. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे त्या काळातील मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध गायक-नट होते. मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. लता दीदींच्या आईचे नाव शुद्धमती त्यांना सर्व जण माई या नावाने संबोधत असत. लता दीदी हे दिनानाथांचे सर्वांत ज्येष्ठ अपत्य. दिनानाथ आणि माईंना लताआशाउषामीना या चार कन्या आणि हृदयनाथ हा मुलगा अशी पाच अपत्ये झाली. पुढे दिनानाथांप्रमाणेच या सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळविला.

           लता दीदींना अर्थातच पहिले गुरू लाभले ते म्हणजे खुद्द त्यांचे वडील पंडित दिनानाथ. त्यामुळे केवळ वयाच्या पाचव्या वर्षापासून दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांत बाल-कलाकार म्हणून कामं करण्यास सुरुवात केली.

लता दीदी अवघ्या तेरा वर्षांच्या असतानाम्हणजे १९४२ साली पंडित दिनानाथांचं हृदयविकाराने निधन झालं. घरची परिस्थिती हलाखीची होती. माई आणि आपली चार भावंडं यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी दीदींवर येऊन पडली. अशा कठीण काळात प्रसिद्ध नट-दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. त्यांनी दीदींना मराठी चित्रपटांत गाण्याची आणि अभिनयाची संधी दिली. वसंत जोगळेकरांच्या `किती हसालया १९४२ सालच्या चित्रपटातले `नाचू या गडेखेळू सारी मनी हौस भारीहे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वर्षी दीदींनी भूमिका केलेला `पहिली मंगळागौरहा चित्रपटही प्रसिद्ध झाला. याही चित्रपटांनी त्यांनी दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं एक गीत गायलं होते. १९४५ साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली. 

उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. इथेच त्यांचा हिंदी चित्रपटात प्रवेश झाला. वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या `आप की सेवा मेंया हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या `पा लागू कर जोरीहे पहिले गीत दीदींनी गायले.

एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदींना नंतरची तालीम मिळाली.

            लता दीदींचे खूप गाजलेले पहिले गाणे म्हणजे १९४९ सालच्या `महलया चित्रपटातले खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले `आयेगा आयेगा आनेवालाहे गीत. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गीतानंतर दीदींनी मागे वळून पाहिले नाही.

    १९५०नंतर लता दीदींचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला. त्या काळातील अनिल विश्वासनौषादसज्जाद हुसेनवसंत देसाईहंसराज बहलवसंत देसाई यांच्यासारखे जुने आणि त्या काळात उदयाला येणारे एस. डी. बर्मनसलील चौधरीसी. रामचंद्रशंकर-जयकिशनमदन मोहनउषा खन्नारवीकल्याणजी-आनंदजीलक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन अशा सगळ्याच संगीतकारांकडे दीदी गाऊ लागल्या. या सगळ्यांकडे गायलेल्या दीदींच्या गाण्यांना अमाप लोकप्रियता मिळत गेली. ओ. पी. नय्यर यांचा सन्माननीय अपवाद वगळता त्या काळातील जवळजवळ प्रत्येक संगीतकाराकडे दीदी गात होत्या.त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकारांकडे लता दीदींनी गायलेल्या प्रसिद्ध गाण्यांची यादी करायची म्हटलं तर अवघड आहे हे जास्त चांगलं की तेहे जास्त मधुर की तेहे जास्त लोकप्रिय की ते असा संभ्रम पडावा अशी शेकडो गाणी दीदींनी त्या काळातील जवळजवळ प्रत्येक प्रथितयश संगीतकाराकडे गायली आहेत.

संगीतकार सलील चौधरी यांनी `मधुमतीया चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या `आजा रे परदेसीया गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्यानंतर सतत दहा वर्ष त्यांना हे पारितोषिक मिळत राहिले. नंतर मात्र दुसर्‍या गायिकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:हून पारितोषिक घेण्याचे थांबविले.

        १९६२ साली चीनने भारतावर अनपेक्षितपणे आक्रमण केले. त्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ साली दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक खास गीत कवी प्रदीप यांनी लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. ते गीत लता दीदी यांनी गायले. तेच आजही अमाप लोकप्रिय असलेले गीत म्हणजे `ऐ मेरे वतन के लोगो'. हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मराठीतही दीदींनी असंख्य गाणी गायली आहेत. चित्रपट गीतांबरोबरच मराठीतील भावगीते त्यांनी गायली. `आनंदघनया नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी काही मराठी (वादळ) आणि हिंदी (झांजरकांचनलेकीन) अशा चित्रपटांची निर्मितीही केली.

      दीदींना अत्तरे आणि हिर्‍यांची चांगली पारख आहे. त्यांना छायाचित्रे काढायला खूप आवडतेतसेच क्रिकेटची मॅच बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

लता दीदींना अक्षरश: असंख्य पुरस्कार मिळाले. इतर महत्त्वाच्या पुरस्कारांबरोबरच १९६९ साली पद्मभूषण आणि १९९९ साली पद्मविभूषण ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. दरम्यान चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारा `दादासाहेब फाळकेहा सर्वोच्च सन्मान १९८९ त्यांना प्रदान करण्यात आला. एवढेच नव्हेतर भारतातील सर्वोच्च समजला जाणारा `भारतरत्नहा किताब त्यांना २००१ साली प्रदान करण्यात आला.

         काही वर्षांपासून गाणं कमी केलं असलंतरी त्या भरभरून आयुष्य जगत आहेत.. आयुष्य जगणं आणि आयुष्य भारतमातेला अर्पण करणं खुप कमी लोकांच्या आयुष्यात असतं ..आज भारतमातेची गाणकोकीळा जवळपास महिनाभर झाले दावाखानात आहे ... त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करुन हि सर्वाचे प्रयत्न असफल ठरले ... भारतमातेच्या कन्येला भावपूर्ण श्रध्दांजली...लतादिदी आपण अमर आहात .... भारतीयांच्या तनमनात आहात..

एक मेरे वतन के लोगो


साभार : WHATS APP POST

लता मंगेशकर यांच्याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील CLICK HERE या बटनावर क्लिक करा.


स्कॉलरशिप 5 वी सराव प्रश्नपत्रिका संच 
छापील प्रश्नपत्रिका संच उपलब्ध 

अधिक माहितीसाठी खालील कोणत्याही एका चित्रावर क्लिक करा.


















 

आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)

WHATS APP GROUP'S =  (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)

मिशन स्कॉलर       10

मिशन स्कॉलर       11

मिशन स्कॉलर       12

 

 

मिशन स्कॉलर       13

मिशन स्कॉलर       14

मिशन स्कॉलर       15

मिशन स्कॉलर       16

मिशन स्कॉलर       17

मिशन स्कॉलर       18

 

 

 

 

मिशन स्कॉलर       19

मिशन स्कॉलर      20

मिशन स्कॉलर       21

मिशन स्कॉलर       22

मिशन स्कॉलर       23

मिशन स्कॉलर      24

 

 


 

मिशन स्कॉलर       25

मिशन स्कॉलर       26

मिशन स्कॉलर       27

मिशन स्कॉलर       28

मिशन स्कॉलर       29

मिशन स्कॉलर       30






हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :


MISSION ENGLISH   (इंग्रजी तयारी)

CLICK HERE


स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित  संपूर्ण तयारी

CLICK HERE


जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)

येथे क्लिक करा.


मिशन स्कॉलरशिप 5 वी 

येथे क्लिक करा.


गणित : सूत्रे, नियम, व्याख्या

येथे क्लिक करा.


प्रज्ञाशोध परीक्षा सराव

येथे क्लिक करा.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.