मराठी वाक्प्रचार (MARATHI Phrases)

 



मराठी वाक्प्रचार (MARATHI Phrases) 

1.     अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे.

2.     अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग  येणे.

3.     अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

4.     अभंग असणे - अखंड असणे.

5.     अमलात आणणे - कारवाई करणे.

6.     अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

7.     अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे.
8.     अट्टहास करणे - आग्रह धरणे.

9.     अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे.

10.  अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

11.  अनमान करणे - संकोच करणे.

12.  अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

13.  अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

14.  अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.
15.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

16.  अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

17.  अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

18.  अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

19.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.

20.  अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.

21.  आयोजित करणे - सिद्धता करणे.

22.  आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

23.  आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे.

24.  आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.

25.  आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट.

26.  आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.
27.  आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

28.  आड येणे - अडथळा निर्माण करणे.

29.  आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

30.  आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.

31.  आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

32.  आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

33.  आच लागणे - झळ लागणे.

34.  आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
35.  आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे. 

36.  आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.

37.  आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.

38.  इतिश्री करणे - शेवट करणे.

39.  उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.

40.  उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

41.  उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे.

42.  उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

43.  उदास होणे - खिन्न होणे.

44.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

45.  उताणा पडणे - पराभूत होणे.
46.  उदास होणे - खिन्न होणे.

47.  उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे.

48.  उत्पात करणे - विध्वंस करणे.

49.  उसंत मिळणे - वेळ मिळणे.

50.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

51.  उताणे पडणे - पराभूत होणे.

52.  उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे.

53.  ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

54.  उध्वस्त होणे - नाश पावणे.

55.  उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

56.  उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

57.  उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.
58.  उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.

59.  उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

60.  उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

61.  ऊर भरून येणे – गदगदून येणे. 

62.  उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.

63.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

64.  ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे.
65.  ओढा असणे - कल असणे.

66.  ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.

67.  अंग धरणे - लठ्ठ होणे.

68.  अंगावर काटा येणे - भीती वाटणे.

69.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे.

70.  अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे.

71.  अंगाला होणे - अंगाला छान बसणे.

72.  अंगवळणी पडणे – सवय होणे.
73.  अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे.

74.  अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.   

75.  अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

76.  अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

77.  अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

78.  अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे.

79.  अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे.

80.  अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे.

81.  अंग चोरणे – फारच होडे काम करणे.

82.  आंदण देणे - देऊन टाकणे.

83.  आंबून जाणे – विटून जाणे,थकणे.

84.  कणीक तिंबणे - खूप मार देणे.

85.  कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

86.  कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे.

87.  कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे. 

88.  कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे.

89.  कान उपटणे – कडक शब्दात समज देणे.

90.  कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे.

91.  कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे.

92.  कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
93.  कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे.

94.  काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

95.  कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

96.  कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे.

97.  कान निवणे – ऐकून समाधान होणे.

98.  काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे.

99.  कानावर घालणे – लक्षात आणून देणे.

100.     कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

101.     काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

102.     काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

103.     कावराबावरा होणे – बावरणे.
104.    कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.

105.    कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे.

106.    काळीज उडणे - भीती वाटणे.

107.    कुणकुण लागणे - चाहूल लागणे.

108.    कच्छपी लागणे - नादी लागणे.

109.     काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

110.     कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

111.    कूच करणे - वाटचाल करणे.

112.    काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे.

113.    कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे.
114.    कंपित होणे - कापणे थरथरणे.

115.    कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.

116.    कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.

117.    किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

118.    कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे.

119.    कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.

120.    कहर करणे - अतिरेक करणे.

121.    कोडकौतुक होणे - लाड होणे.

122.    काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे.

123.    काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

124.     कंठस्नान घालने - ठार मारणे.

125.     काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे.
126.     कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

127.     कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.

128.     कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

129.    कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

130.    केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे.

131.    कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.
132.    कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे.

133.    खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे.

134.    खपणे – कष्ट करणे,झिजणे.

135.    खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे.

136.    खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.

137.    खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.

138.    खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.

139.    खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.
140.    खडे फोडणे - दोष देणे.

141.    खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

142.    खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.

143.    खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे.

144.    खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे.

145.    खितपत पडणे - क्षीण होत जाणे.

146.    खो घालने - विघ्न निर्माण करणे.

147.    गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे.
148.    गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.

149.    गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे.

150.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

151.    गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.

152.    गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.

153.    गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.
154.    गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.

155.    गुजराण करणे - निर्वाह करणे.

156.    गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.

157.    गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे.

158.    गाडी अडणे – खोळंबा होणे.

159.    ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.

160.    गट्टी जमणे - दोस्ती होणे.
161.    गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे.

162.    गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे.

163.    गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

164.    गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

165.    गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे.

166.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

167.    गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे.

168.    घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.
169.    घागरगडचा सुभेदार – पाणक्या.

170.    घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

171.    घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे.

172.    घाम गाळणे - खूप कष्ट करणे.

173.    घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

174.    घोडे मारणे - नुकसान करणे.

175.    घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

176.    घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

177.    घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.

178.    चतुर्भुज होणे - लग्न करणे.

179.    चक्कर मारणे - फेरफटका मारणे.
180.    चाहूल लागणे - मागोवा लागणे.

181.    चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे.

182.    चेहरा खुलणे - आनंद होणे.

183.    चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे.

184.    चंग बांधणे – निश्चय करणे.

185.    चितपट करणे – कुस्तीत हरविणे.

186.    चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

187.    चुरमुरे खात बसणे - खजील होणे.

188.    चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

189.    चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.
190.     चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.

191.    छाननी करणे - तपास करणे.

192.    छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.

193.     जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

194.     जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे.

195.     जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.

196.     जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे.

197.     जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे.

198.     जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.

199.     जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे.

200.    जळफळाट होणे - रागाने लाल होणे.
201.    जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे.

202.    जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.

203.     जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे .

204.     जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

205.     जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.

206.     जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.

207.     जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.
208.     जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे.

209.     जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे.

210.    जीव वरखाली होणे – घाबरणे.

211.     जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

212.     जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.

213.     जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

214.     जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

215.     जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

216.     जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.
217.     जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.

218.    ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे.

219.     झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य.

220.     झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

221.    झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे.

222.     त्राटिका - कजाग बायको.

223.     टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

224.     टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

225.     टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.
226.    टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे.

227.     टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.

228.    ठसा उमटवणे - छाप पाडणे.

229.    ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.

230.     डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.
231.     डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे.

232.    डाव येणे - खेळात राज्य येणे.

233.    डोक्यावर घेणे - अति लाड करणे.

234.    डोळे फिरणे  - खूप घाबरणे.

235.    डोळा असणे – पाळत ठेवणे.

236.    डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे.

237.     डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

238.     डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.
239.     डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

240.     डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.

241.     डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

242.     डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.

243.     डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे.

244.     डोळे निवणे - समाधान होणे.

245.     डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे.

246.    डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे.
247.    डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे. 

248.    डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.

249.    डोळे वटारणे - रागाने बघणे.

250.    डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे.

251.    डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे.

252.     डोळ्यांत खुपणे - सहन न होणे.

253.     डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

254.     डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.

255.     डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.
256.     डोळे दिपवले - थक्क करून सोडणे.

257.     डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

258.     डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे.

259.     डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.

260.     डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे.

261.     तडीस नेणे - पूर्ण करणे.
262.    तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे.

263.     ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.

264.     तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

265.     तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

266.    ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.

267.    तारांबळ होणे - घाईगडबड उडणे.

268.    ताट वाढणे - जेवायला वाढणे.

269.    तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.

270.    तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे.

271.     तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे.

272.    तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे.

273.    तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे.

274.    तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे.

275.    तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे.

276.     तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे.

277.     तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे.

278.     तोंडाला पाने पुसणे – फसवणे.

279.    तजवीज करणे - तरतूद करणे.

280.     तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे.
281.     तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे.

282.     तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे.

283.     तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे.

284.     तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.

285.     तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे.

286.     तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे.

287.     तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे.

288.     थांग न लागणे - कल्पना न येणे.

289.     थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

290.    दुमदुमून जाणे - निनादून जाणे.
291.     दगा देणे – फसवणे.

292.     दबा धरून बसणे - टपून बसणे.

293.     दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

294.     दात धरणे - वैर बाळगणे.

295.     दाढी धरणे - विनवणी करणे.

296.     दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.

297.     दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

298.     दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

299.    दक्षता घेणे - काळजी घेणे.

300.    दडी मारणे - लपून राहणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.