◾ निवडश्रेणी संदर्भातील माहिती पात्रता व निकष
निवडश्रेणीसाठी शिक्षकांच्या अर्हता ,अनुभव, पात्रता.
संदर्भ - शासन निर्णय 2 सप्टेंबर 1989,शासन निर्णय 1 डिसेंबर 1999,शासन निर्णय 29 जून 2002,शासन निर्णय 15 जुलै 2016
राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षकांना निवडश्रेणीसाठी
अर्हता
1) प्राथमिक शिक्षक(वर्ग
1 ते 8 ,D.Ed पात्रता धारक) :- पदवि प्राप्त करणे आवश्यक (B.A,
B.Com,B.Sc), 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठवेतनश्रेणीचे
प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत
24 वर्षे सेवा
2) माध्यमिक शिक्षक
(वर्ग 9 ,10 वि B.Ed पात्रता):-
वरीष्ठवेतन श्रेणी
प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत
24 वर्षे सेवा,पदवीधर शिक्षकांनी पदव्यूत्तर पदवी करणे आवश्यक आहे
उदा-अ) B.A
B.Ed धारकांनी M.A/M.Ed/M.A(Edu)
ब) B.Com
B.Ed धारकांनी M.Com/M.Ed/M.A(Edu)
क) B.Sc
B.Ed धारकांनी M.Sc
/M.Ed/M.A(Edu)
टीप - ज्या शिक्षकांना अध्यापनाच्या विषयांची पदव्यूत्तर
पदवी किंवा तत्सम अर्हता बहिस्थ:रित्या संपादन करता येत नाही त्या ठिकाणी M.Ed
/M.A शिक्षणशास्त्र ( Edu
) ही पदवी ग्राह्य धरण्यात येते ( शासन निर्णय 15 जुलै 2016 )
टीप - B.Sc B.Ed ( Bio किंवा Math ) यांनी इतर विषयात इतिहास,मराठी,समाजशास्त्र इ MA केले असेल तर ग्राह्य धरले जात नाही .
3) उच्च माध्यमिक शिक्षक:-(11,12 वि) उच्च माध्यमिक शिक्ष( M.A B.Ed/
M.Sc B.Ed/M.Com B.Ed) उच्च माध्यमिक/कनिष्ठ
महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठवेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा, M.Phil / P.hd / M.Ed /संगणकातील पदव्युतर पदवी MS - ACITIT इ अर्हता आवश्यक राहील.
4) विशेष शिक्षक :-
अ) शारीरिक शिक्षक
:- SSC, HSC व एक वर्षे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकांना B.P.Ed ही अर्हता तर B.P.Ed धारकांनी M.P.Ed ही अर्हता प्राप्त करावी
ब) हिंदी शिक्षक:-
SSC,HSC धारकांनी संबधित विषयातील
पदवी अथवा समकक्ष व पदवी धारकांनी संबंधित पदव्युत्तर वा समकक्ष अर्हता धारण करावी.
क) संगीत शिक्षक:-
मॅट्रिक/SSC असलेल्या संगीत विशारद
शिक्षकांनी संबंधित विषयातील पदवी तर पदवीधर शिक्षकांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर
अर्हता धारण करावी
ड) चित्रकला शिक्षक:-
DTC किंवा DMC किंवा ATD अशी अर्हता धारण करणाऱ्यानी आर्ट मास्टर ( AM ) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी( रेखा/रंगकला/उपयोजित कला/ शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील
आर्ट मास्टर प्रमाणपत्र पदवी ( AM ) किंवा कला शिक्षणशास्त्र पदविका ( D.Ed ) अशी अर्हता धारण करावी.
अध्यापक विद्यालय-अध्यापक
विद्यालय त शिक्षकांची नेमणूक M.A/M.Sc, M.Ed ही आहे त्यामुळे वेगळी degreeघेण्याची आवश्यकता नाही .वरिष्ठ वेतनश्रेणी ही कालबध्द वेतनश्रेणी
आहे , टीप - Ded पात्रता धारक जे शिक्षक माध्यमिक शाळेत 5 ते 7 वर प्रथम नियुक्ती झालेली आहे त्यात 12 वर्षा नंतर वरीष्ठवेतनश्रेणी मिळाली आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक
(25%) म्हणून नियुक्ती झाली असेल
व 12 वर्षे झाले असेल तर निवडश्रेणीस
पात्र नाही कारण वेतनश्रेणीत बदल झाला त्यामळे त्याना पदवीधर शिक्षकाची वरीष्ठवेतनश्रेणी
मिळेल.
एक बाब लक्षात ठेवा एकाच वेतनश्रेणीमध्ये 12
वर्षे झाले तरच वरीष्ठवेतनश्रेणी व 24 वर्षे सेवा झाली असेल तरच निवडश्रेणी निवडश्रेणी संवर्गातील वरीष्ठवेतनश्रेणी मधील
सेवाजेष्ठता नुसार 20 % पदांना मिळते सरसकट
मिळत नाही तर माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना द्विस्तरीय वेतनश्रेणी आहे त्यांना
निवडश्रेणी देय नाही...