शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत शासन निर्णय 2022 - 23



१ ली प्रवेश वय निश्चिती 2022 - 23

        शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.
        पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.
        आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर आपणांस यथावकाश कळविण्यात येईल. त्यामुळे वयोमर्यादेबाबत सर्व शाळांना आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे जेणेकरुन या कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत.

शासन निर्णय वाचा  : 



शासन निर्णय डाऊनलोड करा : 



 स्कॉलरशिप 5 वी सराव प्रश्नपत्रिका संच 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.