How are glaciers formed? कुतूहल भाग - 11 हिमनदी कशी निर्माण होते?

 हिमनदी कशी निर्माण होते?

                       आपल्या दृष्टिआड उंच उंच पर्वतांवरील हिमनद्यांमध्ये साठलेले शुद्ध पाणी पृथ्वीवरील सर्व नद्या आणि सरोवरे यांच्यामध्ये असलेल्या शुद्ध पाण्यापेक्षा जास्त आहे. एकट्या अंटार्क्टिकावरील बर्फाच्या कित्येक किलोमीटर जाड थरांमध्ये पृथ्वीवरील एकंदर शुद्ध पाण्याच्या दोन तृतीयांश शुद्ध पाणी साठलेले आहे. समजा, पृथ्वीवरील सर्व हिमनद्या व अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळले तर सागरांच्या पाण्याची पातळी किमान ५० मीटरने वाढेल आणि त्याच्याखाली जगामधील समुद्राच्या काठांवर असणारी सर्व शहरे बुडून जातील. पृथ्वीवरील एकंदर भूमीचा एक दशांश हिस्सा बर्फाने व्यापलेला आहे.


                  इंग्रजीमधील 'ग्लेसिअर' या शब्दाचा अर्थ केवळ हिमनदी असा होत नाही, तर ग्रीनलँड किंवा अंटार्क्टिका भूखंडावर जमा झालेला बर्फ असाही होतो. त्यामुळे पर्वतांवर साठलेल्या बर्फाला 'अल्पाइन ग्लेसिअर्स', व भूखंडांवर साठलेल्या बर्फाला 'कॉन्टिनेंटल ग्लेसिअर्स’ अशी नावे देण्यात आली आहेत. ग्लेसिअर या इंग्रजी शब्दाचे 'हिमांच असे काहीसे रूपांतर करावे लागेल. तसेच मराठीतील हिम आणि बर्फ हे शब्द समानार्थी आहेत, पण इंग्रजीमधील स्नो आणि आइस हे दोन शब्द समानार्थी नाहीत. आकाशातून भुरभुर पडतो व जो कापसासारखा असतो तो स्नो, आणि घट्ट झाला की तो 'आइस'
 उंच उंच पर्वतशिखरांवर आणि काही भूखंडांवर उन्हाळ्यात वितळून जाणाऱ्या बफपिक्षा हिवाळ्यात अधिक बर्फ जमा होत असेल तर हिमनद्या तयार होतात. प्रत्येक वर्षी अगोदर शिल्लक असलेल्या बर्फावर नवीन बर्फ साचत जातो आणि एक विस्तृत बर्फक्षेत्र तयार होते.
 
              बर्फक्षेत्राचे हिमनदीत रूपांतर होण्यासाठी आकाशातून पडणाऱ्या कापसासारख्या स्नोचे बर्फाच्या कणांमध्ये रूपांतर व्हावे लागते. तापमान बराच काळ शून्याच्या खाली राहिले की ही क्रिया सुरू होते. आकाशातून पडलेल्या स्नोचा हवेशी संयोग झाला की त्याचे स्फटिकात रूपांतर होते. हे स्फटिक एकत्र येऊन त्यांच्या गोळ्या बनतात. त्यांच्यामध्ये कित्येक हवेचे बुडबुडे शिल्लक राहतात.
 
जसजसा वरच्या दिशेत अधिकाधिक बर्फ जमा होत जातो तसतसे वरच्या स्तरांचा खालच्या स्तरांवरील दाब वाढत जातो. त्यामुळे बर्फाच्या गोळ्या परस्परांवर दाबल्या जातात आणि त्यांचे घट्ट बर्फात रूपांतर होते. जमा झालेल्या बर्फाच्या थराची जाड़ी ५० ते ६० मीटरपर्यंत पोहोचली की बर्फाचा काही भाग हळूहळू उताराच्या दिशेत गतिमान होतो.
 
               हिमनदीच्या प्रवासाला प्रारंभ झाला की प्रारंभी लहान लहान असणाऱ्या बर्फाच्या गोळ्या एकत्र येऊन त्यांचे अंड्याच्या आकाराचे मोठे गोल बनतात. शिवाय हे गोल अधिक घट्ट असतात. स्वतःच्या प्रचंड वजनामुळे हिमनदी प्रवाहित होते. पण या नदीचे सर्व भाग समान गतीने प्रवास करीत नाहीत. सर्वात खालच्या थराचा भूपृष्ठावरील दगडगोट्यांशी व असमान भूमीशी संपर्क असतो त्यामुळे या भागाची गती मंद असते.
   त्यावरचा थर अधिक वेगाने गतिमान असतो आणि सर्वात वरचा थर ठिसूळ असतो. हिमनदीचे निरनिराळे विभाग वेगवेगळ्या वेगाने गतिमान असल्यामुळे सर्वांत वरच्या ठिसूळ वरामध्ये ताण निर्माण होऊन तो भंग पावतो व मोठमोठ्या चिरा तयार होतात. या चिरांना 'क्रेव्हासेस' असे नाव आहे. बहुतांश हिमनद्यांचा वेग अतिशय मंद असतो. प्रतिदिवशी काही सेंटीमीटर इतकी त्यांची गती मंद असते. काही वेळा मात्र त्यांची गती अचानक वाढते व त्या प्रतिदिवशी ५० मीटर अंतर कापू शकतात.
 
             हिमनदी समुद्राला मिळाली की तिचा पुरोभाग वर उचलला जातो व सुमारे ६० मीटर उंचीचे बर्फाचे कडे तयार होतात. हिमनदीच्या कडांजवळील बर्फ अलग होऊन समुद्रात तरंगत राहतो. त्यांनाच हिमनग असे नाव आहे.
 
            हिमनदीचा पुरोभाग शून्याच्या वर तापमान असलेल्या स्थानी पोहोचला की हिमनदीच्या पुरोभागी असलेले बर्फ वितळते व त्याचे पाण्यात रूपांतर होते. तसेच हिमनदीची जाडीही कमी होत जाते. वितळलेल्या पाण्याचा प्रवाह तयार होतो. गंगेसारख्या एखाद्या नदीचे ते उगमस्थान असते. हिमालयात गंगोत्रीच्या पुढे गोमुख नावाचे एक स्थान आहे. त्याच ठिकाणी हिमनदीचे पाणी बाहेर पडते. गोमुख हेच खऱ्या अर्थाने गंगेचे उगमस्थान आहे.


याधीचे कुतूहल भाग १ ते 10 वाचण्यासाठी खालील कुतूहल या शब्दावर क्लिक करा.

कुतूहल


आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.) 

मिशन स्कॉलर       13

मिशन स्कॉलर       14

मिशन स्कॉलर       15

मिशन स्कॉलर       16

मिशन स्कॉलर       17

मिशन स्कॉलर       18

 

 

 

 

मिशन स्कॉलर       19

मिशन स्कॉलर      20

मिशन स्कॉलर       21

मिशन स्कॉलर       22

मिशन स्कॉलर       23

मिशन स्कॉलर      24

 

 

 

मिशन स्कॉलर       25

मिशन स्कॉलर       26

मिशन स्कॉलर       27

मिशन स्कॉलर       28

मिशन स्कॉलर       29

मिशन स्कॉलर       30


                                                     




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.