शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम 100 % राबणविणेबाबत.

शैक्षणिक वर्ष २०२2-२3 पासून इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम 100 % राबणविणेबाबत. मार्च २०२० पासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यावरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम २५% कमी करण्यात आला होता. तसेच कोविड-१९ आपत्कालीन ते परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आला होता. 

 शासन निर्णय - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते १२ वी साठी १००% पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिध्दी द्यावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०६२४१२३४५३६८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


  वरील शासन निर्णय pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा

याआधीचे बदली २०२२ चे सर्व शासन निर्णय व इतर सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.

पुनर्रचित सेतू अभ्यास दिवसनिहाय मिळवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.