राजे मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी . माहिती Death anniversary of King Malharrao Holkar info


         इंदौर संस्थानाचे संस्थापक,स्वराज्य विस्तारक,पराक्रमी व मुत्सद्दी राजे मल्हारराव होळकर यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!

®️🌞®️🌞®️🌞®️🌞®️🌞

        मल्हारराव होळकर (Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली. होळकर .

        कोण होते 'मल्हारराव होळकर' ?

        आज मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा हा मूळ पुरुष. मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही.

आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांच्या बद्दल महत्वाची माहिती.

            १६ मार्च १६९३ साली मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा  होता. तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनत असे.

            दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.

            १७२८ ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा १७३७ ची दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा तयार झाला आणि त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.

            मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटके पार झेंडा’. पाकिस्तानातील अटक पर्यंत भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता. यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. अटक काबीज करण्याआधी १७५८ साली सरहिंद आणि लाहौर देखील काबीज करण्यात आलं होतं. या नंतर एक म्हण मराठीत कायमची रुजली, ‘अटके पार झेंडा रोवणे.’

            १६ जानेवारी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा पानिपत मध्ये पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांच्या पार्वती बाईंना यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती मल्हाररावांकडे केली. त्यानुसार ते पार्वती बाईंना घेऊन निघून गेले. यानंतर सदाशिवराव भाऊ यांना मृत्यूने गाठले. 

            या आरोपाबरोबर त्यांच्यावर आणखी एक आरोप केला जातो तो म्हणजे ज्या नजीब खानाने अहमदशहा अब्दालीला भारतात बोलावलं आणि पानिपत घडलं त्या नजीब खानाला मल्हाररावांनी आपला दत्तक पुत्र मानला होता. नजीब खानाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला माफ केलं. हाच नजीब खान पुढे जाऊन मराठा साम्राज्याच्या उरावर बसला होता.

            पानिपत नंतर स्वराज्य पुन्हा उभारण्याच्या हेतूने त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. तो पर्यंत नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव ‘माधवराव’ पेशवे झाले होते. या मोहिमांच्या धामधुमीतच आलामपूर येथे २० मे, १७६६ रोजी मल्हाररावांनी अखेरचा श्वास घेतला.

            स्वराज्य राखण्यात आणि ते वाढवण्यात मल्हाररावांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचा मोठा हात होता. अश्या या महान योद्ध्याला  मानाचा मुजरा.

🌞®️🌞®️🌞®️🌞®️🌞

🚩होळकर आणि ध्वज🚩


          आपल्यापैकी अनेकांना अजूनही हे माहित नाही की, संपूर्ण जगाच्या इतिहासात  अभिमान बाळगावा अशी राजवट ज्या इंदौरच्या होळकर घराण्याची होती, त्या होळकरांचा "ध्वज" कोणता होता ? 


            अज्ञानाने आणि अनावधानाने आपण 'पिवळा ध्वज' हाच होळकरांचा किंवा धनगरांचा म्हणून स्विकारतो. परंतु  इतिहास काही वेगळेच सांगतो.

काय आहे इतिहासातील खरे सत्य ??


            होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर लहानपणी पित्याच्या मृत्युनंतर आपले होळ गांव ( ता.फलटण जि. सातारा) सोडून आई जिवाईसह आपले मामा  बारगळ यांचे आश्रयास तळोदे येथे खानदेशात गेले. 


            भोजराज  बारगळ मराठा सरदार  कदमबांडे यांचे सैन्यांत ५० स्वारांसह शिलेदार होते.मल्हारराव यांनी काही वर्षे मेंढपाळ, शेतीमधील कामे करत करत,

            घोडेस्वारी व हत्यार (तलवार, बाण, भाला ,  इत्यादी) चालविण्याचे शिक्षण घेतले. त्यात वाकबगार झाल्यानंतर मामांबरोबर सरदार कदमबांडे यांचे सैन्यांत चाकरी सुरू केली. 

            उत्तरेकडील एका मोहिमेत मल्हाररावांचा युध्दपराक्रम, चपळाई, साहस, संघटनकौशल्य पाहून थोरले बाजीराव पेशवे खूश झाले. त्यांनी बारगळांकडून 'स्वतंत्र सरदार करतो' म्हणून मल्हारराव यांना आपल्याकडे मागून घेतले.भाच्याचे हीत पाहून बारगळांनी त्यास संमती दिली.


                सरदार कदमबांडे यांचेकडून पेशव्यांकडे जाण्यापूर्वी मल्हारराव अनुमती घेण्यासाठी कदमबांडे यांचेकडे गेले असता, त्यांचा गौरव करून कदमबांडे म्हणाले, " तुमच्या शौर्यावर आणि गुणांवर  आम्ही बेहद्द खुष आहोत. तुमच्या गौरवार्थ तुम्हांस काही भेट द्यावे, असे फार वाटते. आपणांस काही हवे असेल तर नि:संकोच मागा." 

            यावर मल्हारराव यांनी विनम्रपणे परंतु पराक्रमी व स्वाभिमानी पुरूषास साजेल असे उत्तर दिले.ते म्हणाले, "आपले आशिर्वादच आमच्याठी लाखमोलाची भेटवस्तू आहे. पण याऊपरही स्वामींच्या मनात काही द्यावयाचेच असेल तर, ज्या निशाणा खाली आम्हांस प्रथम तरवार गाजविण्याची आणि शौर्य दाखविण्याची संधी मिळाली, ते आपले निशाण वापरण्याची आम्हांस अनुमती द्यावी. श्री मल्हारी मार्तंड यांना साक्ष ठेवून सांगतो की, या निशाणाचा सन्मान आम्ही कायम उंचावत ठेवू. त्यास कधीही कमीपणा येवू देणार नाही." 


            मल्हाररावांच्या या उत्तराने अतिशय प्रसन्न मनाने सरदार कदमबांडे यांनी आपल्या देवघरातील चांदीच्या दंडावर असलेले लालपांढरे बांडे निशाण ( बांडे = कदमबांडे यांच ) ढाल- तलवार, शेला-पागोटे यांसह देवून मल्हारराव यांचा यथोचित सत्कार करून आशिर्वादपूर्वक सन्मानाने रवानगी केली.(इ.स. १७२५)

            पुढचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. आपल्या आयुष्यात बावन्न युध्दे करून ती सर्व जिंकण्याचा विश्वपराक्रम सुभेदार मल्हाररावांनी केला तो याच बांडे निशाणा खाली.! थोरल्या बाजीराव पेशव्यांनी उत्तर भारतात केलेल्या प्रत्येक स्वारीच्या वेळी आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि त्यांचे हेच बांडे निशाण.!! एवढेच नव्हे तर रघुनाथराव पेशव्यांच्या

            उत्तर भारतावरील स्वारीत अटकेवर विजय मिळवला तेंव्हाही आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि हेच बांडे निशाण.!!!

xxxx

            श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरानंतर राजकारण, धर्मकारण, न्यायकारण, अर्थकारण, जलसंवर्धन, पशु-पक्षी-वृक्ष संवर्धन आणि मानवता यांमध्ये विश्ववंद्य कार्य करणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रजाहितदक्ष गौरवशाली इतिहासाचा (इ.स.१७६७-१७९५)साक्षी होता हाच बांडा ध्वज.!!!


             श्रीमंत यशवंतराव होळकरांनी संपूर्ण जगावर राज्य करणा-या ब्रिटीशांना पळता भूई थोडी करून नऊ युध्दांमध्ये नामोहरम केले ते याच लाल-पांढ-या बांड्या निशाणाच्या साक्षीने.!!!

            पुढे महाराज यशवंतराव यांची कन्या पहिली भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर यांनी ब्रिटीशांना आव्हान दिले, तेंव्हा त्यांच्या सैन्याच्या अग्रभागी होते ते हेच बांडे निशाण.!!!


            होळकर घराण्यातील चौदा राजांच्या जनहितैषी राज्यकारभाराचे २२२वर्षे (इ.स.१७२५-१९४७) साक्षीदार असणारे हे बांडे निशाण.!


            भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (द्वितीय) यांनी इंदौर संस्थान भारतीय संघराज्यात सम्मिलीत करून हे बांडे निशाण भारत सरकारच्या स्वाधीन केले.भारतीय संघराज्यामध्ये प्रमुख संस्थानांच्या काही प्रतिकात्मक बाबींचा समावेश करण्यात आला. होळकर संस्थानच्या जागेवर ( रायसीना भाग ) उभ्या असलेल्या राष्ट्रपती भवनातील भारताच्या तिन्ही सैन्यददलांचे प्रमुख असणा-या राष्ट्रपतीं पथकाचा ध्वज म्हणून बांडे निशाण स्विकारण्यात आले.!!!

            १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिना निमित्त किंवा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनामध्ये राष्ट्रपती पथकाबरोबर तुमच्या-माझ्या अभिमानाचा विषय असणारे हे बांडे निशाण दिमाखाने फडकत असते.!


सौजन्य - आंतरजाल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.